Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृता दुर्गुळेनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:12 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीतील आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने नुकतीच प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे जय जय स्वामी समर्थ या मालिकेत कालिंदीची भूमिका गालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा रायबागी. पूजा रायबागीचे प्रसाद दापकेसोबत नुकतेच लग्न पार पडले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

अभिनेत्री पूजा रायबागीने अभिनेता प्रसाद दापकेसोबत नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्न सोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर हळदी आणि मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 २८ डिसेंबर २०२१ रोजी पूजा रायबागीने प्रसाद सोबत साखरपुडा केला होता. या दोघांचा साखरपुडा यातील खास क्षण वायरल झाले होते. पूजाचा नवरा देखील अभिनेता असून त्याचे नाव प्रसाद दापके आहे.

जय भवानी जय शिवाजी या मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. त्याने या मालिकेत गोपीनाथपंत बोकील यांची भूमिका साकारली होती. सोबतच सिंधू या लोकप्रिय मालिकेत देखील त्याने गंगाधर अष्टपुत्रेची भूमिका साकारली आहे. तर पूजा सध्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेत चांदोली ला नेहमी त्रास देणाऱ्या कालिंदीच्या भूमिकेत दिसत आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळे