Join us

"ग्रामीण, गावठी, घाट्या, घाट्यावरच्या हे शब्द ऐकल्यानंतर..", ग्रामीण भाषेबद्दल सयाजी शिंदे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:37 IST

Sayaji Shinde: सयाजी शिंदे यांनी नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ग्रामीण भाषेबद्दलचं आपलं मत मांडलं.

सयाजी शिंदे (Sayaji Shinde) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मराठी, हिंदी शिवाय विविध भाषेतील सिनेमात काम केले आहे. ते साउथमध्येही खूप लोकप्रिय आहेत. नुकतेच त्यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी ग्रामीण भाषेबद्दलचं आपलं मत मांडलं.

सयाजी शिंदे म्हणाले की, मुळात भाषेचा विद्यार्थी असल्यामुळे भाषा ही तुमच्या मनातले विचार व्यक्त करण्याचे आधी विचार असतात नंतर भाषा असते आता यात तुमची भाषा मागची हे असं नाही खरं ओरिजनल सगळ्यात चांगली भाषा म्हणजे ग्रामीण भाषा अस्सल भाषा मातीतली भाषा जी तुमच्या बॉडी लँग्वेजला जास्त दिसते ती खरी भाषा नेमकं त्यालाच कमी लेखतात त्यामुळे मला तो आत्मविश्वास होता की हे काय मुंबई जे आले होते ना त्या झुलवामध्ये ती भाषा होती ना कुठे पासली पडायला गेली होतीस वगैरे असं करत बोलायचं ना तर मला मुंबईला साहेब ते जर शब्द कळत नाहीत तर मी म्हटलं तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुमच्या अकलेचा प्रॉब्लेमआहे कारण हे बरोबर असेच बोलतात. हे शब्द म्हणजे इथं हाय फाय इंग्लिश किंवा हाय फाय मराठी कुठली याला प्रमाण म्हणायचं ती म्हणजे चांगली असं आहे का नाही सगळ्यांनी सगळ्यांच्या भाषेबद्दल आदर ठेवला पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, समजलं तर समजून घेतलं पाहिजे पण ग्रामीण, गावठी, घाट्या, घाट्यावरच्या हे शब्द ऐकल्यानंतर म्हणलं या की एकदा तुम्ही पण समोर मग बघा कोण ताकतीचं आहे ते आहे ना पोहायला या पळायला या डोंगरावर या इकडे या बघू बरं कोण ताकतीचं लावते तर त्यामुळे मुळात त्यांच्याबद्दल आपल्याला राग असण्याचं कारण नाही ते कमीपणा देतात परत परत कमीपणा गावातल्या लोकांना देतात त्याचा राग आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या जागेवर राहावं नम्र राहावं. सगळ्यांना आदर देऊन राहावं आणि जी आपल्या आईची भाषा असते. ती जगात अप्रतिम भाषा असते. त्यानंतर बॉडी लँग्वेज असते त्यानंतर इतर भाषा असतात आणि सगळ्यांना भाषा ही जगावीच लागते मी तेलगूत गेलो तर मी सातारी तेलगू बोलतो तामिळमध्ये गेलो तर सातारी तामिळ बोलतो कारण ते बोललो तर मी चांगला व्यक्त होऊ शकतो तर व्यक्त करणारी भाषा असते ती खरी भाषा ना.

टॅग्स :सयाजी शिंदे