Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त चित्रपट! ‘डेब्यू’ सुपरहिट होताच मौनी रॉयने घेतला मोठा निर्णय!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 08:52 IST

होय, ‘गोल्ड’च्या यशाने मौनी कमालीची सुखावलीय आणि आता केवळ चित्रपटांतचं काम करण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपलीय.

‘देवों का देव महादेव’ आणि ‘नागीन’ सारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली छोट्या पडद्यावरची सर्वाधिक लोकप्रीय अभिनेत्री मौनी रॉय आता केवळ छोट्या पडद्यावरची अभिनेत्री राहिलेली नाही. होय, गत स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्ताला मौनी रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मधून तिचा डेब्यू झाला. या चित्रपटात मौनीने अक्षय कुमारची पत्नी मोनोबिनाची भूमिका साकारली आणि तिची ही भूमिका पे्रक्षकांनाही भावली. मौनीचा यापेक्षा उत्तम बॉलिवूड डेब्यू होऊच शकला नसता, असेही या चित्रपटानंतर मानले जात आहे. एकंदर काय तर मौनी आता मोठ्या रूपेरी पडद्याची अभिनेत्री झाली आहे आणि म्हणूनचं यापुढे छोट्या पडद्यावर काम करायचे नाही, असा निर्णय तिने घेतल्याचे कळतेय.होय, बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘गोल्ड’च्या यशाने मौनी कमालीची सुखावलीय आणि आता केवळ चित्रपटांतचं काम करण्याच्या निर्णयाप्रत येऊन ठेपलीय. सूत्रांचे खरे मानाल तर मौनीला आता टीव्हीवर परत जायचे नाही़ विशेष म्हणजे, ‘गोल्ड’ रिलीज होण्यापूर्वीच मौनीने चार चित्रपटही साईन केले आहेत. ‘गोल्ड’च्या प्रमोशनवेळी खुद्द अक्षय कुमारने ही माहिती दिली होती. यापैकी एक आहे, ‘ब्रह्मास्त्र’ आणि दुसरा आहे जॉन अब्राहमचा ‘रॉ’. या दोन्ही चित्रपटात मौनी अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. अन्य दोन सिनेमे कोणते आहेत, ते मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.काही दिवसांपूर्वी मौनीला तिचा कथित एक्स-बॉयफ्रेन्ड मोहित रैनासोबत एक जाहिरात आॅफर झाली होती. पण मौनीने ही आॅफर धुडकावून लावली. कदाचित बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेताच, मौनी रॉयने टीव्हीला पूर्णपणे मागे सोडले आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते, ते जरूर कळवा.

टॅग्स :मौनी राॅय