Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी सान्या सागरला घटस्फोट दिल्यानंतर प्रतीक बब्बर थाटणार दुसरा संसार, आता या अभिनेत्रीला करतोय डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:17 IST

Prateek Babbar: प्रतीक बब्बर हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अनेकदा चर्चेत येत असतो. सध्या तो त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

प्रतिक बब्बर हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अनेकदा चर्चेत येत असतो. सध्या तो त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. पत्नी सान्या सागरपासून विभक्त झाल्यानंतर प्रतीक बब्बरच्या आयुष्यात नव्या लेडी लव्हची एन्ट्री झाली आहे.

खरं तर, मीडिया रिपोर्टनुसार, प्रतीक बब्बर बार बार देखो फेम अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करतो आहे. अभिनेत्याच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की 'ते दोघे एकमेकांना एका वर्षापासून ओळखत आहेत. दोघेही टीव्ही इंडस्ट्रीतील एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते. प्रतीक बब्बरने त्याची जोडीदार प्रिया बॅनर्जीबद्दल त्याच्या कुटुंबियांना आधीच सांगितले आहे.

प्रतीक आणि प्रिया बर्‍याचदा हँग आउट करतात आणि एकत्र काम करतात. परंतु सध्या त्यांचे नाते लो-प्रोफाइल ठेवायचे आहे. त्याचे कारण म्हणजे प्रतीक बब्बरची पत्नी सान्या सागरसोबत झालेला घटस्फोट. अद्याप यावर प्रतीकने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रतिक बब्बर हा ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. सान्यासोबत काही वर्षे डेटिंग केल्यानंतर प्रतीकने २३ जानेवारी २०१९ रोजी लग्न केले. पण लग्नानंतर वर्षभरानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. अखेर प्रतीक आणि सान्या यांचे नाते टिकले नाही.

प्रतीक बब्बर वर्कफ्रंट

वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर, प्रतीक बब्बर 'वो लड़की है कहाँ' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तापसी पन्नू आणि प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत आहेत. दुसरीकडे, प्रिया बॅनर्जीबद्दल बोलायचे तर, तिने संजय गुप्ता यांच्या 'जज्बा' या चित्रपटातून सियाच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

टॅग्स :प्रतीक बब्बर