Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन दया बेनची होणार एंट्री, या अभिनेत्रीची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 09:55 IST

दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मेटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती शोमध्ये येईल असे बोलले जात होते.

दया भाभी तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये परत येणार की नाही? या प्रश्नामुळे त्यांचे फॅन्स सध्या चिंतेत आहेत. एका वर्षांपासून जास्त काळ दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणी शोमधून बाहेर आहे. दीशा  मालिकेत कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपुर्वी आले होते. मात्र मालिकेचे निर्माते असीत मोदीने दिलेल्या माहितीनुसार नवीन दयाबेनचा शोधात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे दीशा वाकानीने अखेर या मालिकेला अलविदा म्हटले आहे आता दीशा मालिकेत झळकणार नाही हे स्पष्ट होते. तुर्तास दया बेन भूमिकेसाठी नवीन नाव समोर येत आहे.  

त्यात आघाडीवर शिल्पा शिंदेचे नाव समोर येत आहे. दुस-या स्थानावर कॉमेडीयन सुगंधा मिश्रा, रागीनी खन्ना, स्मिता बन्सल आणि सिमोना चक्रवर्ती यांची दया बेन या भूमिकेसाठी वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिली. पण यापुढे मालिकेच्या कथानकाची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणं योग्य नसल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे वरील अभिनेत्रींपैकी कोणाची वर्णी लागते हे पाहणं रंजक असणार आहे. 

दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मेटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती शोमध्ये येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. मुलीच्या देखरेखीत व्यस्त असल्यामुळे दीशाने मालिकेत ब्रेक घेतला होता.

दिशाचा पती मयूरच्या हस्तक्षेपामुळे ती मालिकेत कमबॅक करु शकत नसल्याच्याही चर्चा होत्या. सीए असलेल्या मयूरला दिशाने काम करू नये असं वाटत असल्याचं सांगितलं जात होते.  दिशाने काय करावं,तिच्या मनात काय सुरू आहे, घरात काय चाललंय हे आम्हाला माहित नसल्याचेही निर्मात्यांनी सांगितले  होते. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी