Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'ची चर्चा असतानाच 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर, रणवीर सिंगला टक्कर द्यायला येतोय शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:38 IST

सगळीकडे 'धुरंधर'ची चर्चा सुरू असताना रणवीर सिंगला टक्कर द्यायला शाहरुख खानही तयार आहे. शाहरुखच्या 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर'ची चर्चा होताना दिसत आहे. पाकिस्तानात राहून हेरगिरी करणाऱ्या भारतीय गुप्तहेरांच्या कामगिरीवर हा सिनेमा आधारित आहे. लवकरच या सिनेमाचा सीक्वलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सगळीकडे 'धुरंधर'ची चर्चा सुरू असताना रणवीर सिंगला टक्कर द्यायला शाहरुख खानही तयार आहे. शाहरुखच्या 'पठाण २'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

दुबईमधील एका रिअल इस्टेट इव्हेंटमध्ये 'पठाण २'बाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. या इव्हेंटमध्ये डेव्हलपरने 'पठाण'च्या सीक्वलवर शिक्कामोर्तब केलं आहे. या इव्हेंटमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो म्हणतो, "कोणता ब्लॉकबस्टर सिनेमा असेल तर त्याचा सीक्वल येतो. 'पठाण' नंतर आता 'पठाण २' येत आहे". लवकरच या सिनेमाचं शूटिंगही सुरू होणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, पुढच्या वर्षी 'पठाण २' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये 'पठाण' प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा, निखत खान, डिंपल कपाडिया अशी 'पठाण'ची स्टारकास्ट होती. तर सलमान खानने यात कैमिओ केला होता. 'पठाण २'बाबत चाहतेही उत्सुक आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Pathaan 2' update arrives amid 'Dhurandhar' buzz; SRK to clash with Ranveer.

Web Summary : Amidst 'Dhurandhar' buzz, 'Pathaan 2' confirmed at Dubai event. Sequel shooting to commence soon, pitting Shah Rukh Khan against Ranveer Singh.
टॅग्स :शाहरुख खानपठाण सिनेमा