बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सर्रास आपले हॉट, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तूर्तास दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता दिशाच्या झोळीत भाईजानचा आणखी एक चित्रपट पडला आहे. होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान व दिशाची जोडी लवकरच एका मेगा बजेट फिल्ममध्ये दिसणार आहे.हा चित्रपट कोणता? तर ‘किक 2’. काही दिवसांपूर्वी दिशाला साजिद नाडियाडवाला यांच्या आॅफिसात स्पॉट केले गेले होते. ही भेट ‘किक 2’संदर्भातचं होती, असे आता कळतेय. सूत्रांचे मानाल तर याचवर्षी अखेरिसपर्यंत या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे.
दिशा पटानी २०२० मध्ये करणार धमाका! मिळाला ‘भाईजान’चा आणखी एक चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 11:34 IST
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सर्रास आपले हॉट, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तूर्तास दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता दिशाच्या झोळीत भाईजानचा आणखी एक चित्रपट पडला आहे.
दिशा पटानी २०२० मध्ये करणार धमाका! मिळाला ‘भाईजान’चा आणखी एक चित्रपट!!
ठळक मुद्दे‘किक 2’मध्ये दिशा सलमानच्या अपोझिट दिसणार आहे. यात दिशाची भूमिकाही सलमानच्याच तोडीची असेल. तूर्तास तिच्या भूमिकेबद्दल फार तपशील बाहेर आलेला नाही. पण लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे.