Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच श्वेता तिवारीने केले ग्लॅमरस फोटोशूट, लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 13:49 IST

अभिनेत्री श्वेता तिवारीला काही दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला काही दिवसांपूर्वी अचानक तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब कमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर श्वेताच्या टीमने एक स्टेटमेंट जाहीर केले होते. त्यांनी म्हटले होते की, काही काळापासून श्वेता सतत प्रवास करत असून तिला पुरेशी विश्रांती मिळत नव्हती, त्यात हवामान बदल या कारणामुळे तिलाा त्रास झाला होता. आता श्वेताला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून तिने पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे. यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा नवीन लूक चाहत्यांना खूप भावला आहे.

श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि तिने बरेच फोटो शेअर केले आहेत. श्वेता तिवारीने व्हाइट ड्रेसमधील फोटो शेअर करत लिहिले की, ते माझा तिरस्कार करतात पण ते माझे पेज धार्मिकदृष्ट्या तपासतात.

आणखी एक फोटोशूट दोन दिवसांपूर्वी शेअर करत तिने लिहिले की, तुझा जन्म खरेपणासाठी झाला आहे, परिपूर्ण होण्यासाठी नाही! काय म्हणू…

या फोटोंतील तिचा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. ते या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री येते चर्चेत 

श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत येते आहे. २०१९ पासून श्वेता आणि तिचा एक्स नवरा अभिनव कोहलीमध्ये मुलाच्या कस्टडीवरून वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाने तिला तिच्या पाच वर्षाच्या मुलाची कस्टडी दिली आहे. न्यायालयाने अभिनव कोहलीला आपल्या मुलाला दिवसातून ३० मिनिटे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलण्याची आणि आठवड्याच्या शेवटी दोन तास भेटण्याची परवानगी दिली आहे.

आई तशी लेक!

श्वेता काही दिवसांपूर्वी ‘खतरों की खिलाडी’ ११मध्ये झळकली होती. दरम्यान श्वेताची मोठी लेक पलक लवकरच ‘रोझी: द सॅफरन चॅप्टर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. पलकदेखील आईप्रमाणे ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

टॅग्स :श्वेता तिवारी