Join us

'बाहुबली'नंतर या दमदार भूमिकेत दिसणार देवसेना उर्फ अनुष्का शेट्टी, २०२५ला येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:09 IST

Anushka Shetty : 'बाहुबली'मध्ये देवसेनाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अनुष्का शेट्टी लवकरच रुपेरी पडद्यावर दमदार अवतारात दिसणार आहे.

'बाहुबली' (Bahubali Movie) चित्रपटातील देवसेना या व्यक्तिरेखेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी साउथ अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरच दमदार अंदाजात पाहायला मिळणार आहे. ती घाटी या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच्या या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. तसेच या चित्रपटाचे एक अतिशय नेत्रदीपक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले, जे पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 

चित्रपट निर्मात्यांनी आता घाटीच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे अनुष्का शेट्टीचे चाहते खूप खूश आहेत. अनुष्काचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'घाटी' यावर्षी नव्हे तर पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात ती राणीप्रमाणे शत्रूंपासून सुटका करताना दिसणार आहे. घाटी चित्रपटातील अनुष्का शेट्टीची व्यक्तिरेखा खूप रागीट आणि रहस्यमय दिसते आहे.

कृष जगरलामुदी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या घाटीमध्ये अनुष्का शेट्टी दमदार भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनुष्काला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दाखवण्यात आले आहे. अलीकडेच निर्मात्यांनी एका पोस्टरसह रिलीजची तारीख जाहीर केली. घाटी १८ एप्रिल, २०२५ रोजी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा करताना निर्मात्यांनी एक्स अकाउंटवर लिहिले की, द क्वीन आपल्या सर्वोत्कृष्ट रुपात बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे. घाटी १८ एप्रिल, २०२५ ला जगभरात रिलीज होईल. हा चित्रपट तेलगू, तमीळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय अनुष्काचा कथानार हा चित्रपटदेखील २०२५मध्ये रिलीज होणार आहे. अनुष्काचे चाहते तिला दमदार अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

टॅग्स :अनुष्का शेट्टीबाहुबली