Join us
Daily Top 2Weekly Top 5

रकुलप्रीत सिंहच्या या व्हिडीओने घातलाय धुमाकूळ, यो यो हनी सिंहलाही देत आहे टक्कर

By अमित इंगोले | Updated: October 28, 2020 16:37 IST

राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांच्या 'छलांग' सिनेमातील यो यो हनी सिंगचं हे गाणं फॅन्सना चांगलंच आवडलंय. या गाण्यात राजकुमार राव रॅप करताना दिसत आहे.

सध्या राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांच्या 'छलांग' सिनेमातील गाणं 'केअर नी करदा' नवीन चॅलेंज बनून सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. रकुलप्रीत सिंहचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या गाजतो आहे. ज्यात ती या गाण्यावर रॅप करताना दिसत आहे. 

राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांच्या 'छलांग' सिनेमातील यो यो हनी सिंगचं हे गाणं फॅन्सना चांगलंच आवडलंय. या गाण्यात राजकुमार राव रॅप करताना दिसत आहे. नुकताच अर्जुन कपूरनेही त्याचा असाच एक व्हिडीओ शेअर केला होता. आता त्याच गाण्याचा रकुलप्रीत सिंहचा रॅप व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओ शेअर करत रकुलने अर्जुन कपूरला तिला नॉमिनेट करण्यासाठी धन्यवाद दिले आहेत.

याआधी अर्जुन कपूरने या रॅपचं इमोशनल व्हर्जन आणि लाउड अ‍ॅक्टिंग करत व्हिडीओ शेअर केला होता. या दोघांचाही व्हिडीओ फॅन्सना आवडला आहे. दरम्यान, अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत सिंह दोघेही दिग्दर्शक काश्वी नायरच्या डेब्यू सिनेमात दिसणार आहे. यात क्रॉस-बॉर्डर लव्हस्टोरी बघायला मिळेल.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत केसमधील ड्रग प्रकरणात रकुलप्रीत सिंहचंही नाव समोर आलं होतं. एनसीबीने रकुलला समन्स पाठवला होता. त्यानंतर तिची अनेक तास चौकशी करण्यात आली होती. तिने ती ड्रग्स घेत नसल्याचं सांगितलं होतं.  

टॅग्स :रकुल प्रीत सिंगबॉलिवूडसोशल मीडियाअर्जुन कपूर