Join us

तब्बल ८ वर्षांच्या कालावधीनंतर आदित्य वैद्यचं 'तू चाल पुढं' मालिकेतून कमबॅक, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 15:31 IST

Aditya Vaidya : आदित्य वैद्य 'तू चाल पुढं' मालिकेत श्रेयस वाघमारेची भूमिका साकारताना दिसतो आहे. त्याने या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha) ही मालिका १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर निर्माण केले आहे. या मालिकेत अश्विनीच्या भूमिकेत अभिनेत्री दीपा परब चौधरी (Deepa Parab Chaudhary) दिसत आहे. तिने या मालिकेतून मराठी सिनेइंडस्ट्रीत बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर कमबॅक केले आहे. तसेच या मालिकेत अभिनेता आदित्य वैद्य (Aditya Vaidya) आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. 

आदित्य वैद्य तू चाल पुढं मालिकेत श्रेयस वाघमारेची भूमिका साकारताना दिसतो आहे. त्याने या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्याने अभिनयाची कारकीर्द  १९९८ पासून सुरु केली. त्यानंतर त्याने अनेक मालिका केल्या. या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासाबद्दल बोलताना आदित्य म्हणाला की, ‘तू चाल पुढं’ ही मालिका मला ८ वर्षांच्या गॅपनंतर मिळाली, यासोबतच झी मराठीसारख्या मोठ्या वाहिनीसोबत काम करण्याची संधी मिळाली. ही भावना सुंदर आणि आनंदायी आहे. 

तो पुढे म्हणाला की, या मालिकेतील माझ्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, मी श्रेयस वाघमारे ही भूमिका या मालिकेत साकारत आहे. श्रेयस या पात्राच्या मालिकेत अनेक छटा आहेत. श्रेयस स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहतो, आणि घरासाठी धडपडत असताना, तो आपल्या बायकोशी कधी अहंकारी असतो तर कधी प्रेमळ असतो. हे पात्र साकारताना मला खूप शिकता आलं आणि ही भूमिका साकारताना फार मज्जा येते. या भूमिकेसाठी मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ही मालिका आणि माझी भूमिका नक्की आवडतेय.

टॅग्स :झी मराठी