Join us

कोरोना होण्यापासून थोडक्यात बचावला बॉलिवूडचा हा गायक, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 15:31 IST

दिवसांदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसांदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 63 वर पोहोचली आहे. गायक अदनाना सामी म्हणतो मी कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचलो आहे. त्याने सांगितले "मी माझ्या बायको आणि मुलीसोबत  स्पेनला जाणार होतो पण आताची परिस्थिती बघता मी ऐनवेळेस जाणे रद्द केले नाही तर आज मी आणि माझे कुटुंब क्वारंटाईन  झालो असतो"

अदनान कोणाचेही नाव न घेता कनिका कपूरवर टीका केली आहे. तो म्हणाला, प्रत्येक भारतीयांनी मुख्यतः कलाकारांनी सध्याच्या परिस्थितीला गांभिर्याने घेऊन एक उदाहरण दिले पाहिजे. तुम्ही जर प्रवास करत असाल तर कृपया भारतीय अधिकाऱ्यांना त्याची माहिती तुम्ही परत आल्यावर देत जा. स्वार्थी व अविचारी वागू नका आणि  अशावेळी पार्टी आणि समारंभात जाणे टाळा जेव्हा तुम्हाला घरी राहायला सांगितले गेले आहे.

पुढे तो म्हणाला, लॉकडाऊन करून घेणे म्हणजे आपल्याला स्वतःला रिचार्ज करण्याची एक संधी मिळत आहे. परमेश्वराने दाखवलेला मार्ग आहे ज्यातून तो आपल्याला सांगू इच्छितो की "थोडे थांबा तुम्ही फार वेगाने जातायं, स्वतःला वेळ द्या तुमचे आयुष्य कुठे चाललंय हे माहीत नसलं तरी पण गोष्टी बदलायला एक सेकंद सुद्धा पुरेसा असतो.  

टॅग्स :अदनान सामीकोरोना वायरस बातम्या