Join us
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये गुलाबी थंडीत हनीमून एन्जॉय करतोय आदित्य नारायण, समोर आला पहिला फोटो....

By गीतांजली | Updated: December 17, 2020 15:06 IST

आदित्य नारायण लग्नानंतर हनिमूनला रवाना झाला आहे.

गायक आणि होस्ट आदित्य नारायण लग्नानंतर हनिमूनला रवाना झाला आहे. पत्नी श्वेतासमवेत तो काश्मीरमधील बर्फाचा आनंद घेतो आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये दोघेही ही ट्रिप एन्जॉय करतायेत. 

त्यांच्या हनिमूनचा पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. आदित्यने स्वत: श्वेता अग्रवालसोबत इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केले आहे. फोटोत आदित्य आणि श्वेता दोघेही खूप गोड दिसतायेत.

आदित्य सांगत आहे की ही त्याची पहिली काश्मीर ट्रिप आहे. यापूर्वी त्याला देशाच्या या सुंदर भागात जाण्याती संधी मिळाली नव्हती. तो लिहितो- हनीमूनला सुरुवात झाली आहे. 'मी पृथ्वीवरच्या स्वर्गात पहिल्यांदाच आलो आहे.' हा फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. चाहत्यांना या नवीन जोडप्याची केमिस्ट्री खूप आवडते आणि ते सतत कमेंट् करतायेत. 

आदित्याने याआधीच तो एकदा नाही तर वेळा हनीमूनला जाणार असल्याचे सांगितले होते. यात आदित्यने शिलिम, सुला वाइनयार्ड्स आणि गुलमर्गला जाणार असल्याचे म्हटले होते. काश्मीरला तर आदिचत्य पोहोचला आहे. आता आणखी दोन म्हणजे शिलिम आणि सुला वाइनयार्ड हे दोन्ही महाराष्ट्रात असणाऱ्या ठिकाणी देखील तो हनीमूनसाठी जाणार आहे. आदित्य आणि श्वेताने 1 डिसेंबरला लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.  

टॅग्स :आदित्य नारायण