Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदिती राव हैदरीनं अभिनेता सिद्धार्थ सोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 17:42 IST

Aditi Rao Hydari : बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती सिद्धार्थसोबत दिसत होती. ही क्लिप समोर आल्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता आदिती रावने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) सध्या चर्चेत आहे. अलीकडेच तिची ताज डिवाइड बाय ब्लड ही वेब सिरीज रिलीज झाली आहे, जी लोकांना खूप भावते आहे. याशिवाय आदिती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आदिती रावने एक रील शेअर केला होता ज्यामध्ये ती सिद्धार्थसोबत डान्स करताना दिसली होती. ही क्लिप समोर आल्यानंतरच त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. दरम्यान, आता अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने यावर आपले मौन सोडले आहे.

अदिती राव हैदरी याबाबत म्हणाली की, 'मी कामात व्यस्त आहे, त्यामुळे मी त्याकडे लक्ष देत नाही. लोक बोलतील आणि तुम्ही त्यांना बोलण्यापासून रोखू शकत नाही. लोकांना जे आवडते तेच करतील आणि मला जे आवडते ते मी करत आहे. मला असे वाटते की ते ठीक आहे आणि जोपर्यंत माझ्याकडे खूप चांगले काम आहे आणि मला आवडते अशा दिग्दर्शकांसोबत काम करणे सोपे आहे. ती पुढे म्हणाला की, जोपर्यंत लोकांना मी पसंत पडते आणि मला पाहतात तोपर्यंत मला खूप आनंद होतो.

आदिती राव हैदरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, जे पाहून तिचे चाहते घायाळ होतात. सध्या अभिनेत्री तिच्या वेब सीरिज ताज: डिवाइड बाय ब्लडच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीची वेबसीरिज प्रेक्षकांना खूप आवडते आहे. या सीरिजमध्ये आदितीने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

याशिवाय आदिती संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या सीरिजमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, सिद्धार्थ लवकरच कमल हासनच्या इंडियन २ चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :आदिती राव हैदरी