Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी ड्रेस अन् भांगात कुंकू, लग्नानंतर पहिल्यांदाच अदिती-सिद्धार्थ कॅमेऱ्यासमोर, नववधूच्या लूकवर खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:16 IST

अदिती आणि सिद्धार्थने गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली होती. आता लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि अदिती कॅमेऱ्यासमोर आले आहेत. 

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने १६ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ४०० वर्ष जुन्या मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली. अदिती आणि सिद्धार्थने गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली होती. आता लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि अदिती कॅमेऱ्यासमोर आले आहेत. 

लग्नानंतर अदिती आणि सिद्धार्थ मुंबईत परतले आहेत. त्यांना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. लग्नानंतर पहिल्यांदाच अदिती आणि सिद्धार्थ कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचा एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत अदितीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातल्याचं दिसत आहे. तिने भांगेत कुंकूही भरल्याचं दिसत आहे. नववधू अदितीचा हा लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन त्यांचे एअरपोर्टवरील फोटो शेअर करण्यात आले आहेत. अदिती आणि सिद्धार्थला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

आदिती आणि सिद्धार्थ  यांनी काही वर्ष एकमेंकाना डेट केल्यानंतर लग्न केलं आहे. दोघांची पहिली भेट ही  २०२१ मध्ये तेलगू सिनेमा 'समुद्रम'च्या सेटवर झाली होती. यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघेही एकमेकांना डेट करु लागले. सुरुवातीला या दोघांनीही त्याचं नातं गुप्त ठेवलं असलं तरीही नंतर मात्र त्यांनी अधिकृतपणे नात्याचा जाहीर खुलासा केला होता. आदितीचं हे दुसरं लग्न असून तिने याआधी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं होतं. त्यानंतर 4 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. 

टॅग्स :आदिती राव हैदरीसेलिब्रिटी