Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हो.. पब्लिक प्लेसमध्ये मी किस केलंय..", आदिनाथ कोठारेने उघड केलं त्याचं सीक्रेट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 12:45 IST

आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती.

मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. 'छकुला' या चित्रपटातील बालकलाकाराची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आदिनाथ अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. 'चंद्रमुखी', 'झपाटलेला २' अशा चित्रपटांत काम करुन  आदिनाथने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. 

अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींबाबत आदिनाथने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना भाष्य केलं. यावेळी रॅपिड फायर राऊंडमध्ये आदिनाथला अनेक प्रश्न विचारण्यात आली याची उत्तर हि अभिनेत्याने दिली. यादरम्यान त्याला आदिनाथने पब्लिक प्लेसमध्ये कधी किस केलंय का असा प्रश्न विचारण्यात आला. याच उत्तर देताना आदिनाथ काहीवेळा थांबला मग, त्याने विचारलं भारतात का? त्यावर त्याला सांगण्यात आलं भारतात नाही जगभरातील कुठल्याही पब्लिक प्लेसवर. थोडा दबक्या आवाजात लाजत म्हणाल, हा म्हणजे केलंय असं म्हणाला.'  

आदिनाथने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे. '८३' या चित्रपटात तो झळकला होता. त्यानंतर 'क्रिमिनल जस्टिस', 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. आता तो 'बजाओ' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :आदिनाथ कोठारे