Join us

कधी वाटलं नव्हतं... कळकट्ट, पोटाचा घेर असलेला आयुष्याचा काळ..., उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:34 IST

Urmila Nimbalkar :उर्मिलाने पुन्हा एकदा आपल्या बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत उर्मिलाने लिहिलेल्या कॅप्शननेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

ठळक मुद्दे उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमास्तेसोबत लग्नगाठ बांधली. या वर्षी एप्रिल महिन्यात तिने पतीसोबतचे फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली होती.

प्रसिद्ध युट्यूबर आणि मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने  गेल्या ऑगस्ट महिन्यातच एका गोंडस बाळाला जन्म दिला.  माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली, असं म्हणत तिनं ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. यानंतर बाळाचे काही फोटोही तिने शेअर केले होते. आता उर्मिलाने पुन्हा एकदा आपल्या बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत.  बाळाला न्हाऊ घातल्यानंतर उर्मिला त्याचे लाड करताना या फोटोत दिसतेय. आई आणि लेक दृष्ट लागावी इतके सुंदर दिसताहेत. या फोटोंची चर्चा आहेत. पण या फोटोसोबत उर्मिलाने लिहिलेल्या कॅप्शननेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

‘आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की,सर्वात कष्टाचा, सर्वात जास्त शिकवणारा, सर्वात कळकट्ट (आंघोळ नाही, केसांची दशा, कोरडी त्वचा) सर्वात जास्त पोटाचा घेर असलेला,आयुष्याचा काळ..माझा सर्वांत आनंदी काळ असेल ’,असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं आहे.तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.  उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमास्तेसोबत लग्नगाठ बांधली. या वर्षी एप्रिल महिन्यात तिने पतीसोबतचे फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली होती. उर्मिला आणि सुकिर्त यांची एका थिएटर ग्रुपद्वारे पहिल्यांदा ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुकिर्त हा पेशाने पत्रकार असून एका पब्लिकेशनसाठी तो काम करतो.उर्मिलाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने दुहेरी, एक तारा, दिया और बाती या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिला प्रेग्नेंट होती तेव्हा अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. यासोबतच डोहाळे जेवणाचे अनेक फोटो व एक छानसा व्हिडीओ देखील तिन सोशल मीडियावर शेअर केला होता. उर्मिला  एक मराठीमधील प्रसिद्ध अशी युट्यूबर देखील आहे. तिच्या यूट्यूब चॅनलवर ती ब्यूटी, लाईफस्टाईल अशा विविधा विषयावर माहिती शेअर करत असते.

टॅग्स :उर्मिला निंबाळकर