Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने खरेदी केली आलिशान कार, म्हणाली- माझ्या आयुष्यातला हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 13:38 IST

यंदाची गणेश चतुर्थी तेजस्विनी पंडितसाठी चांगलीच खास ठरली. तेजस्विनी नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली.

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि तितकीच बिंधास्त अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित ( tejaswini pandit). दमदार अभिनयासह तेजस्विनी तिच्या बिंधास्त स्वभावामुळेही ओळखली जाते. कोणतीही भूमिका उत्तमरित्या साकारणारी तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रीय असते. 

यंदाची गणेश चतुर्थी तेजस्विनी पंडितसाठी चांगलीच खास ठरली. तेजस्विनी नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली. तेजस्विनीने महिंद्राची एक्सयुव्ही ७०० ही गाडी खरेदी केली आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.  ''||गणपती बाप्पा मोरया || माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर share करतेय..."माझी स्वतःची नवीन कार.... माझ्यासाठी कार ही कधीच luxury नव्हती, necessity होती...पण मी स्वतःला एक luxurious #madeinindia कार गिफ्ट करू शकले ह्यासाठी आत्ता मनात फक्त कृतज्ञता आहे.''

''आजपर्यंत खूप प्रवास केला... पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं..आता नुसता प्रवास नाही करायचा ..आता प्रवासाची "मज्जा लुटायची... " आई, दीदी आणि आजपर्यंतच्या प्रवासात नेहमीच माझ्या बरोबर असणारा माझा "बाबा"...तुमच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झालं...'' सेलिब्रेटींसह चाहत्यांनी तेजस्विनीचं अभिनदंन केलं आहे. 

दरम्यान, तेजस्विनी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये ती झळकली आहे. काही दिवसांपूर्वीच तिची रानबाजार ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली

टॅग्स :तेजस्विनी पंडितरानबाजार वेबसीरिज