Join us

"स्वत:बद्दल अभिमान असायला हवा, कारण...", आयुष्यातील कठीण काळाबद्दल तेजश्री प्रधान स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:04 IST

अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे तिने शेअर केलेल फोटो किंवा पोस्ट लगेच व्हायरल होतात.

 'होणार सून मी या घरची', 'अग्गंबाई सासूबाई' अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून तेजश्री प्रधान (tejashri pradhan). अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरातील रसिकांची लाडकी अभिनेत्री आहे. आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. छोट्या पडद्यावरच नाही तर रुपेरी पडद्यावरही तेजश्रीने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. उत्तम अभिनयासह तेजश्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत येत असते. कायम चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या तेजश्रीची सोशल मीडियावर एक पोस्ट चर्चेत आली आहे. 

सध्या इंडस्ट्रीतील तिचा वावर कमी असला तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे तिने शेअर केलेल फोटो किंवा पोस्ट लगेच व्हायरल होतात. आता तिची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे.

तेजश्रीने स्वत:चा इन्स्टाग्राम नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. यात ती स्मित हास्य करत एकटक पाहताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले, “तुला स्वत:बद्दल अभिमान असायला हवा, कारण तू तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ एकट्याने घालवला आहेस. ज्यावेळी इतर सर्वांना तू ठिक आहेस, असं वाटतं होतं”, असे कॅप्शन तेजश्रीने दिले आहे. 

तेजश्रीची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी तिला नेहमी आनंदात राहण्याचा सल्ला दिला आहे. तेजश्री मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिकांच्या माध्यमातून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीत तिने तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकांसोबतच तेजश्री काही गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्येही झळकली आहे 

टॅग्स :तेजश्री प्रधान