Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २४ वर्षांनी तब्बूच्या 'या' गाजलेल्या सिनेमाचा येतोय सिक्वेल, रिलीज डेटही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 19:01 IST

तब्बूूच्या गाजलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचा २४ वर्षांनी सिक्वेल येतोय

तब्बू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. तब्बू सध्या विविध सिनेमांमधून नानातऱ्हेच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मन जिंकतेय. तब्बूचे अनेक सिनेमे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. तब्बूच्या अशाच एका गाजलेल्या सिनेमा सिक्वेल चाहत्यांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा म्हणजे 'चांदनी बार'. तब्बल २४ वर्षांनी 'चांदनी बार' सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा झाली असून रिलीज डेटही जाहीर झालीय.

'चांदनी बार'मध्ये तब्बू, अतुल कुलकर्णी, अनन्या खरे, राजपाल यादव, मीनाक्षी साहनी आणि विशाल ठक्कर या कलाकारांनी भूमिका केल्या होत्या.  2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची पटकथा आणि संवाद मोहन आझाद यांनी लिहीले होते. मधुर भांडारकर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आता मोहन यांनीच सिनेमाच्या सीक्वेलची तयारी सुरु केली असून ते 'चांदनी बार 2' चं दिग्दर्शनही करणार आहेत.

'चांदनी बार 2' च्या स्क्रिप्टचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता कास्टिंग फायनल केल्यानंतर २०२४ च्या मध्यापर्यंत प्री प्रोडक्शनला सुरूवात होईल. या चित्रपटासाठी अद्याप कोणत्याही कलाकाराला अधिकृतपणे संपर्क करण्यात आलेला नाही. पहिल्या चित्रपटातील काही कलाकारांचा सिक्वेलमधील भूमिकांसाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे. 'चांदनी बार' ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आता या चित्रपटाचा सिक्वेल पुढील वर्षी म्हणजेच डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :तब्बूराजपाल यादवअतुल कुलकर्णीमधुर भांडारकर उपेंद्र लिमये