Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जय मल्हार'मधील म्हाळसा उर्फ सुरभी हांडे करणार राजकारणात प्रवेश? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 10:58 IST

सध्या सगळीकडे राजकीय वातावरण आहे.

सध्या सगळीकडे राजकीय वातावरण आहे. लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. त्यातच मनोरंजनसृष्टीतही राजकारणाचं वारं आहे. अनेक कलाकारही राजकारणात प्रवेश करत आहेत. यातच आता 'जय मल्हार'मधील म्हाळसा उर्फ सुरभी हांडे राजकारणात एन्ट्री घेणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. आता याबद्दल थेट सुरभी हांडेनेच भाष्य केले आहे.

सुरभी हांडेनं नुकतेच प्लॅनेट मराठीला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, 'आज जिथे तिथे बिजेपी आहे. अनेक गोष्टी छान घडत आहेत. आता नव-नवीन ज्याच्या लोकांना अपेक्षाही नव्हत्या अशा छान गोष्टी आपल्या इंडियात होवू शकतात किंवा आत्ता महाराष्ट्रात सुद्धा. तर मला असं वाटतं की, याचा छोटाचा पार्ट व्हायला आवडेल. तर बघुयात पण, एक गोष्ट सांगते मी राजकारणात नाही पण, सांस्कृतीक गोष्टींसाठी काही तरी काम नक्की करेल'.

सुरभी हांडेचा 'संघर्षयोद्धा' हा नवीन चित्रपट येणार आहे.  या चित्रपटाची कथा मनोज जरांगे पाटील यांची आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. सुरभी सोशल मीडियावरही सक्रीय असते, तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सुरभीने  पौराणिक आणि सामाजिक विषय असलेल्या मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयानी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. 

टॅग्स :सुरभी हांडेसेलिब्रिटीराजकारण