Join us

अभिनेत्री सुकन्या मोने यांच्या घरी आली नवीकोरी कार; पोस्ट शेअर करण्याचे कारण आहे ‘खास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 14:16 IST

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी- मोने सध्या जाम खूश आहेत. होय, कारण घरी नवी कार आलीये.

ठळक मुद्देसुकन्या कुलकर्णी-मोने यांना आपण विविध नाटक, चित्रपट आणि मालिका अश्या सर्वच माध्यमांवरील त्यांच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे आणि उत्तम नृत्य कौशल्यामुळे ओळखतो.

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने ( Sukanya Kulkarni-Mone) सध्या जाम खूश आहेत. होय, कारण घरी नवी कार आलीये. यानिमित्ताने सुकन्या यांनी लिहिलेली एक पोस्ट सध्या लक्ष वेधून घेतेय. नव्या को-या कारसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्या लिहितात, ‘कितीतरी महिने नवीन गाडी घ्यायची मनात चालू होतं कारण आधीची SX4 10 वर्षे यथेच्छ वापरली, खूप साथ दिली होती तिने पण दुसरी कुठली आम्हाला पसंतच पडत नव्हती मग संजय म्हणाला electric गाडी बघू,माझ्या मनाला काही पटत नव्हतं कारण अनेक प्रश्न भेडसावत होते....charge कशी आणि कुठे करायची? किती वेळ battary पुरेल वगैरे वगैरे. मनाची तयारी करून मी आणि माझा सारथी चंदन प्रभादेवीच्या TATA motors ला गेलो आणि TATA nexon ev बघताक्षणी आवडली आणि ठरवलं हीच घ्यायची. त्याचे फायदे पुनीत मोटर्स च्या सिद्धेश ने आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले,त्याचे operation सुमेध नामजोशी ने सविस्तर सांगितले आणि आम्ही लगेच book केली. Lockdown... आम्हाला झालेला covid ह्यामुळे गाडी यायला उशीर झाला पण finally 25 जून 2021 ला आमची गाडी आली. ह्यात काय एवढं कौतुक अस वाटेल तुम्हाला पण पेट्रोल आणि डिझेल च्या किमती इतक्या गगनाला पोचल्या आहेत की अश्यावेळी भविष्याचा विचार करणारी, पर्यावरणाचा समतोल राखणारी( non pollution), eco freindly गाडी घेतल्याचा आनंद तुमच्याबरोबर share करावासा वाटला. आम्ही TATA बरोबर.thanks to Ratantata...’

टॅग्स :सुकन्या कुलकर्णी