Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेच्या साडीतील फोटोशूटमध्ये दिसल्या दिलखेच अदा, चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 07:00 IST

सोनालीच्या चाहत्यांनी तिच्या फोटोशूटला भरभरुन दाद दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.  मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. सोनालीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत तिचं साडीतले फोटोशूट शेअर केलं आहे. गुलाबी रंगाच्या साडीत सोनाली खूपच सुंदर दिसतेय. सोनालीच्या चाहत्यांनी ही तिच्या फोटोशूटला भरभरुन दाद दिली आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात अनेक योगासन करतानाचे फोटो सोशल मीडियावर सोनाली शेअर करत असते.

मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे.बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती.  या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. सोनानी काही महिन्यांपूर्वी तिचे WOW नावाचं युट्यूब चॅनेल सुरु केले आहे.या चॅनेलच्या माध्यमातून ती हेल्थ, वेलनेस व फिटनेसशी निगडीत सल्ले प्रेक्षकांना देत असते.सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली.

अशी स्वत:ला फिट ठेवते अभिनेत्री सोनाली खरे, जाणून घ्या तिचा फिटनेस फंडा, See Pics

 

टॅग्स :सोनाली खरे