Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sonali Khare: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत सोनाली खरेने केलंय लग्न; सेटवर फुलली त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 16:35 IST

अभिनेत्री सोनाली खरेप्रमाणे तिचा पतीही हिंदी कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. सोनाली अनेकवेळा त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

अभिनय क्षेत्रात अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणाऱ्या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. त्यामध्ये सोनाली खरे आणि त्याच्या अभिनेत्या पतीचंही नाव सामील आहे. सोनाली खरेने विविध प्रकारच्या भूमिका साकारत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता ती फार रुपेरी पडद्यावर झळकत नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोनाली खरेचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. नुकतंच सोनालीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलंय.  

सोनाली कुलकर्णीच्या पतीचं नाव बिजय आनंद आहे.  सोनालीने  बिजय आनंदसोबत लग्न करत संसार थाटला आहे. दोघांचेही लव्हमॅरेज आहे. बिजय आनंदने सिनेमात झळकण्यापूर्वी मालिकेत काम केले होते. अलिकडेच बिजयने सोनालीसोबतचे काही रोमाँटिक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोंवर चाहत्यांनी ही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.   

‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान दोघांचीही पहिली भेट झाली होती. तेथून त्यांच्या प्रेमालाही सुरुवात झाली होती. दोन-अडीच वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. एकमेकांच्या आवडी- निवडी जाणून घेतल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मालिका विश्वासत एंट्री केल्यानंतर सिनेमात काम करायला सुरुवात केली होती.

बिजय आनंदने १९९८ साली 'प्यार तो होना ही था' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याच सिनेमातून तो प्रचंड प्रकाशझोतात आला होता.सिनेमात काजोल आणि अजय देवगणसह बिजय आनंदच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती.‘आसमान से आगे ‘, ‘यश’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘स्माईल प्लिज’ हे सिनेमे आणि काही हिंदी टीव्ही मालिकेतून विजय आनंदने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.सोनाली आणि बिजय यांना एक मुलगी आहे तिचे नाव सानया आहे.

टॅग्स :सोनाली खरेसेलिब्रिटी