Join us

हुबेहुब आईची कार्बन कॉपी आहे सोनाली खरेची लेक; सौंदर्यामध्ये स्टारकिड्सना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 11:10 IST

आईप्रमाणे ती देखील लोकप्रिय आहे. सोनाली अनेकवेळा तिच्यासोबतचे फोटो शेअर करत असते.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनाली अनेकवेळा तिच्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. 

सोनालीच्या लेकीचं आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सोनालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनालीच्या मुलीचं नाव सनाया आनंद असून ती देखील आपल्या आईप्रमाणे लोकप्रिय होत आहे.

सनायाने एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. ‘ब्लड रिलेशन’ असं तिच्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. विशेष म्हणजे कमी वयात सनायाचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियाचा आधार घेते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली सनाया अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

आईप्रमाणे सनायाचे वडीलदेखील अभिनेते आहेत. बिजय आनंद सनायाच्या वडिलांचं नाव आहे. बिजयने आपल्या करियरची सुरूवात १९९४ आसमाँ या मालिकेद्वारे केली होती. जवळपास चार वर्षे मालिकेत काम केल्यानंतर बिजयने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९९८ साली प्यार तो होना ही था या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केले आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. 

टॅग्स :सोनाली खरेसेलिब्रिटी