Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री स्मिता तांबेने शेअर केला लेकीचा पहिला फोटो, चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 17:38 IST

स्मिता तांबेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. स्मिता तांबेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. स्मिताने आपल्या लेकीची पहिली झलक सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

स्मिता तांबेने इंस्टाग्रामवर तिचा पती आणि लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सूर्यफुला तुझ्यासमोर काहीच महत्त्वाचे नाही. पालक म्हणून आमची निवड केल्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. माझे प्रेम. या फोटोवर चाहते आणि कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

स्मिताची मैत्रीण-कोरिओग्राफर फुलवा खामकर हिने एक खास व्हिडीओ शेअर करत ही स्मिताची गोड बातमी सगळ्या चाहत्यांना सांगितली होती.

फुलवा खामकरने शेअर केलेल्या या खास व्हिडीओत अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पहायला मिळाला होता. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय सध्या आणि सोप्या पद्धतीने हा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात स्मिताच्या खास जवळच्या मैत्रिणी अर्थात अभिनेत्री अदिती सारंगधर, अमृता संत आणि रेषां टिपणीस सहभागी झाल्या होत्या.

या खास प्रसंगी मैत्रिणींनी मिळून स्मिताला फुलांच्या दागिन्यांनी सजवले होते. गाणी म्हणत या मैत्रिणींनी स्मिता ‘कुणीतरी येणार येणार गं’ या गाण्यावर सगळ्याजणींनी ठेका धरला होता. तसेच स्मिताचा नवरा धिरेंद्र यांनीही या सोहळ्यात डान्स केला. स्मिताच्या डोहाळे जेवणाचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता.

टॅग्स :स्मिता तांबे