Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आबोली' मालिकेत होणार 'बिग बॉस मराठी'मधल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री, जाणून घ्या कोण आहे ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:48 IST

स्टार प्रवाहवरील 'आबोली' (Aboli) मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारतेय. तर अभिनेता सचित पाटील इन्सपेक्टर अंकुशी ही व्यक्तिरेखा साकारतोय.

स्टार प्रवाहवरील 'आबोली' (Aboli) मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारतेय. तर अभिनेता सचित पाटील इन्सपेक्टर अंकुशी ही व्यक्तिरेखा साकारतोय. मालिकेत  प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज आहे. आता मालिकेत आणखी एक अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. 

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून रेशम टिपणीस आहे. होय, मालिकेत लवकरच रेशमची एंट्री होणार आहे. ती या मालिकेत वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेशम यात विश्वासच्या वकिलाची भूमिका साकारणार आहेत. रेशमच्या एंट्रीमुळे मालिकेत काय नवं वळणं लागणार हे आपल्याला लवकरच कळेल. 

रेशम टिपणीसने हिंदी आणि मराठी सिनेमा तसेच मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. रेशम 'बिग बॉस' मराठी रिएलिटी शोमुळे चर्चेत आली. या शोमधील तिचा बोल्ड, बिनधास्त व फटकळ अंदाज प्रेक्षकांना आवडला होता. रेशम जीवनातील कुठलीगी खासगी गोष्ट असो किंवा मग भूमिका तिला जे आवडते ते करते. त्यामुळे तिचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आता रेशमने तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यामातून संपर्कात असते. 

टॅग्स :रेशम टिपणीसस्टार प्रवाहटिव्ही कलाकारबिग बॉस मराठी