Join us
Daily Top 2Weekly Top 5

बंगला सॅनिटाइज करण्यासाठी बीएमसीला अभिनेत्री रेखा देत नाहीयेत परवानगी?, लवकरच करणारेत कोविड 19ची टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 11:21 IST

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर पालिकेने त्यांचा बंगला सील केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहेत. जेव्हापासून रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे तेव्हापासून रेखालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. पण अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. त्यात असे समजतंय की महापालिकेने रेखा यांचा बंगला सील केला आहे. याशिवाय रेखा यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनचा बोर्डदेखील लावला आहे.

यादरम्यान रेखा यांनी कोरोना टेस्ट करण्यासाठी तयार नसल्याचे बोलले जात होते. पण या सगळ्या चर्चांमध्ये असे समजले की रेखा कोरोना टेस्टसाठी तयार आहेत.

अभिनेत्री रेखा यांच्या मॅनेजरने बीएमसीला फोन केला आणि सांगितले की, पुढील दोन ते तीन दिवसांत रेखा व फरजाना दोघेही कोविड 19ची टेस्ट करणार आहेत आणि त्यांच्या टेस्टनंतर रिपोर्ट लगेच बीएमसीला पाठवले जाईल.

रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीएमसीचे कर्मचारी रेखा यांच्या घरी गेले. घर सॅनिटाइज करण्यासाठी ते सात दिवस सातत्याने रेखा यांचा दरवाजा वाजवत होते. पण कोणीच गेट खोलला नाही, असे एकीकडे बोलले जात आहे. तर दुसरीकडे असेही वृत्त मिळतंय की तिथले सॅनिटायजेशनचे काम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :रेखा