Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकाराच्या झटक्याने झाला अभिनेत्रीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 11:41 IST

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

ठळक मुद्देरिना उत्तराखंडांतील प्रादेशिक भाषेतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने 'पुष्पा छोरी...' या लोकगीतासोबतच 'भग्यान बेटी', 'मायाजाल', 'फ्योंली ज्वान व्हेगी' या सुपरहिट गाण्यांमध्ये तिने अभिनय देखील केला आहे. 

उत्तराखंडातील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री रिना रावतचं गुरुवारी निधन झालं. रिनाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून ती केवळ 38 वर्षांची होती. तिच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

रिना उत्तराखंडांतील प्रादेशिक भाषेतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने 'पुष्पा छोरी...' या लोकगीतासोबतच 'भग्यान बेटी', 'मायाजाल', 'फ्योंली ज्वान व्हेगी' या सुपरहिट गाण्यांमध्ये तिने अभिनय देखील केला आहे. 

अभिनेता पन्नू गुंसाईने सोशल मीडियावर रिनाचा फोटो शेअर करत तिच्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेत त्या दोघांचा एक टिकटॉक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. रिना गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल असताना तिने पन्नूशी संपर्क साधला होता. त्यावेळी पन्नू रिनाला जाऊन भेटला देखील होता असे देखील त्याने पोस्टद्वारे म्हटले आहे.

रिनाचे लग्न दीपिक रावत सोबत झाले असून दीपिक सरकारी नोकरी करतो. त्या दोघांचे 2005 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. 

टॅग्स :हृदयविकाराचा झटका