Join us

विमानात प्रवासादरम्यान प्रसिद्ध अभिनत्री घेते अशी खबरदारी, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:38 IST

Raveena Tandon Shares A Video To Aware Of Coronavirus: एकंदरितच तिनं करोनाबाबत जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे.

कोरोनाचे दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहून सध्या प्रत्येकजण कोरोनापासून बचावासाठी घेता येईल तितकी खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.बाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचेही पालन करत आहेत.काही कलाकारा आता वेगेवगळ्या कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत.

 

यात रवीना टंडनचाही एक व्हिडीओ समोर आला आहे.  कोरोनामुळे तिनेही मास्क, फेसशिल्ड लावले आहे.विमानात प्रवास करताना जरा जास्तच दक्षता घ्यावी लागते. म्हणून रवीना टंडने असे काही केले की, त्याची चर्चा रंगत आहे. समोर आलेला व्हिडीओ जुनाच आहे. 

मात्र गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रवीनाने कलाकारांना खास टीप्स दिल्या आहेत. विमानात प्रवासादरम्यान प्रत्येकाने ही टीप्स वापरावी अशी आहे. रवीनाचा समोर आलेल्या व्हिडीओत विमानातून प्रवास करताना आपली सीट आणि आजूबाजूचा भाग सॅनिटाइझ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून थोडं विचित्र वाटेल पण, आपण ज्या सीटवर बसणार आहोत ते आधीच सॅनिटाइज करणे चांगले. यामुळे स्वतःची आणि दुसऱ्यांचीही काळजी घेऊयात असेही तिने म्हटले आहे.

याआधीह ट्रेनमध्ये प्रवासा करतानाचा रवीनाचा व्हिडीओ समोर आला होता. तो व्हिडीओ देखील अशाच संदर्भातला होता.  या व्हिडीओमध्ये रवीना टंडन ट्रेनमध्ये प्रवास करताना दिसली होती आणि त्यावेळी स्वतःची सीट आणि केबीन सॅनिटाइझ करतानाचा पाहायला मिळाले होते. एकंदरितच तिनं करोनाबाबत जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रवीना टंडनने आपल्या सिनेमामधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. रवीना 46व्या वर्षी आजी झाली आहे.रवीनाने आपल्या नातवासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केला होता.रवीनाने 1995 मध्ये दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षं होते तर छाया आठ वर्षांची होती.

रवीना टंडनने या दोन्ही मुली वाढवल्या आणि त्यांचे लग्न केले. छायाने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. ज्याचे नाव रुद्र ठेवण्यात आले. रुद्रबरोबरचे फोटो रवीना अनेकवेळा शेअर करत असते.

टॅग्स :रवीना टंडन