Join us

व्हॅकेशन मूड ऑन ! कामातून ब्रेक घेत पती उमेश कामतसोबत प्रिया बापट करतेय काश्मीरमध्ये एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 18:43 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय कपलपैकी एक आहे.कामातून ब्रेक घेत सध्या दोघे व्हॅकेशन एन्जॉय करतायेत.

 मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या दोघांनी कामातून ब्रेक घेत व्हॅकेशनवर गेले आहेत.  

प्रिया आणि उमेश काश्मीरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतायेत. दोघांनी तिथले फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत. जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत. त्यांच्या चाहत्यांनाही हे फोटो आणि व्हिडीओ आवडले आहेत. लाईक्स पाऊस त्यांनी पाडला आहे. 

प्रिया बापट आणि उमेश कामतने सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नबेडीत अडकले. ते दोघे एकाच इंडस्ट्रीत असल्याने खूप अगोदरपासून एकमेकांचे चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेतला आणि प्रेम व्यक्त केले. उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला होकार दिला. 

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत