प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता शूटिंगमधून वेळ काढत बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट देत असते. काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ताने या आश्रमात लावणी नृत्य केलं. अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये प्राजक्ताच्या भाची आणि तिची आई गुरु रविशंकर यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
प्राजक्ताने सहकुटुंह घेतलं गुरुंचं दर्शन
प्राजक्ता माळीने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमातील फोटो शेअर करुन लिहिलंय की, "नृत्य सादरीकरण वगैरे आहेच; पण खरं म्हणजे मी जाते गुरूंना भेटण्याकरीता, आशिर्वाद घेण्याकरीता. आणि यावेळी माझ्याबरोबर घरातल्यांनाही गुरूदर्शन मिळालं; याचा मला अत्यानंद झालाय.विशेषतः १- याज्ञसेनी (भाची). हा तीचा महाराष्ट्राबाहेरचा पहिला प्रवास होता. तो ही आश्रमाचा… त्यात गुरूदेव दर्शन, त्यांना स्वतःचं नाव सांगत वगैरे वगैरे…
२- तनया… वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आशीर्वाद घेता आले. आई, नेहा, दिव्यालाही पहिल्या खेपेत दर्शन मिळालं.बाकी मी तर आश्रमात येत जात राहीनच… After all, it’s my HOME.(गुरूभेटीचं महत्व त्यांना जास्त कळेल, जे सुदर्शन क्रिया शिकलेत. Advance course नंतर आणखी जास्त कळेल. ४-५ advance नंतर अधोरेखित होत राहील.)
प्राजक्ताने आश्रमात केलं लावणीनृत्य
अलीकडेच प्राजक्ताने आश्रमात आयोजित करण्यात आलेल्या 'भाव २०२५' या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी सादर केली. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यासमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्यानं प्राजक्तानं आनंद व्यक्त केलाय. प्राजक्ताने लावणी कला सादर करतानाचे काही फोटो शेअर केले होते. प्राजक्ता माळी शूटिंगमधून जसा वेळ मिळेल तसंं श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट देत असते.