Join us
Daily Top 2Weekly Top 5

"निरोप घेतेय, कारण...", तेजश्री प्रधानच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेमधून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट, भावुक होत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 10:59 IST

१५ दिवसांचा प्रवास संपला! 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचा लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला निरोप, म्हणाली...

Poorva Gokhale: झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील समर (सुबोध भावे) आणि स्वानंदी (तेजश्री प्रधान) यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते आहे. अलिकडेच या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. एकीकडे समर आणि स्वानंदी यांच्यामध्ये मैत्रीचं नातं खुलत असतानाही त्यांच्या आयुष्यात किमया नावाचं वादळ येतं. किमया ही राजवाडेंची खास मैत्रीण असते, तिच्या येण्याने  स्वानंदी-समरच्या नात्यात नवं वळण आलंय. किमयाच्या या एन्ट्रीने स्वानंदीला समरवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते आणि त्याची कबुली देखील देते.पण, तिने ड्रिंक केल्यामुळे तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.  


'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेमध्ये किमयाची भूमिका मराठी अभिनेत्री पूर्वा गोखले साकारली आहे. सुबोध भावे आणि पूर्वा गोखले यांनी झी मराठी वाहिनीवरील 'कुलवधू' या मालिकेमध्ये एकत्र काम केलेलं. त्यानंतर बऱ्याच काळानंतर पूर्वा प्रेक्षकांच्या भेटीला आली. अशातच या मालिकेतून अभिनेत्री पूर्वा गोखले एक्झिट घेत आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहून अभिनेत्रीने चाहत्यांना माहिती दिली आहे.शिवाय मालिकेच्या सेटवरील काही खास फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने सेटवर केक कापून सेलीब्रेशन केलं आणि सर्वांना निरोप दिला. दरम्यान,पूर्वा गोखलेने 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पूर्वा गोखलेने पोस्ट शेअर करत लिहिलंय," किमया...ती वादळासारखी आली आणि हळूवारपणे या प्रवासाचा भाग झाली. आणि यावेळी किमया नावाचं हे वादळ अनेकांना आवडलं. ही भूमिका पाहुण्या कलाकाराची होती आणि १५ दिवसांतच मी तुमचा निरोप घेतेय. या भूमिकेला सर्वांनी आपलंसं केलंत. माझ्यावर सगळ्यांनी प्रेम, कौतुकाचा वर्षाव केलात. त्यासाठी मी तुमची आभारी आणि कृतज्ञ आहे."

यानंतर पुढे अभिनेत्रीने मालिकेतील सहकलाकारांबद्दल प्रेम व्यक्त केलं. ती म्हणाली,या सेटवर काम करताना अगदीच घरासारखं वाटलं. तुमची सगळ्यांची खूप आठवण येईल." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashri Pradhan's show exit: Actress bids farewell with emotional message.

Web Summary : Poorva Gokhale exits 'Veen Dogantali Hi Tutena' as Kimaya. Her character, a guest role, concluded after fifteen days. She expressed gratitude for the love received and fondness for her co-stars, feeling at home on set.
टॅग्स :टेलिव्हिजनतेजश्री प्रधान सुबोध भावे सेलिब्रिटी