Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर हजेरी लावणार अभिनेत्री पूजा सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 17:07 IST

गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत या दोन्ही कलाकारांनी युवा डान्सिंग च्या व्यासपीठावर भरपूर मजा केली.

झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय. अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. त्यामुळे सध्या अनेक मराठी चित्रपट कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रोमोशन व्यासपीठावर करतात. बोनस या चित्रपटाची टीमसुद्धा यावेळी युवा डान्सिंग क्वीनच्या सेटवर आली आणि त्यांनी भरपूर मजा केली. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत या दोन्ही कलाकारांनी युवा डान्सिंग च्या व्यासपीठावर भरपूर मजा केली.

 पूजा सावंत ही उत्तम अभिनेत्री बरोबर उत्तम नर्तिकासुद्धा आहे. त्यामुळे युवा डान्सिंगच्या व्यासपीठावर तिने तिच्या नृत्याची झलक दाखवण्याची संधी जराही सोडली नाही. अधीर मन झाले या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य करीत तिने जजेस सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे मनही जिंकले. महत्वाचं म्हणजे तिने हे नृत्य साडीमध्ये केले. त्याच बरोबर तिने कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत दादरकर आणि स्पर्धक गिरीजा प्रभू, आयुषी भावे आणि क्षमा देशपांडे यांच्याबरोबर रॅम्प वाक सुद्धा केला. या रॅम्पवॉक मध्ये जज मयुरेश वैद्य कसा चालतो, सोनाली कुलकर्णी कशी चालते आणि अभिनेत्री गायत्री दातार कशी नाचत चालते याची एक मजेशीर झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली. 

टॅग्स :पूजा सावंत