Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्त मुलांना आणि कुटुंबांना आधार देण्यासाठी पुढे आले अभिनेत्री पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:07 IST

  पल्लवी आणि विवेक एनजीओसमवेत सध्याच्या परिस्थितीमुळे पीडित असलेल्या मुलांची आणि कुटूंबाच्या मदतीवर भर देत आहेत.

अभिनेत्री पल्लवी जोशी आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कोरोनाग्रस्त मुलांना आणि कुटुंबांना दत्तक घेण्यासाठी एका एनजीओशी हातमिळवणी केली आहे. कोरोनामुळे देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला चाप बसला आहे, तरी मदत कार्यासाठी सिनेसृष्टीतील हे जोडपे पुढाकार घेत आहे.

अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे चित्रपट निर्माते पती विवेक रंजन अग्निहोत्री हे जोडपं कोव्हिड-19 मुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी, तज्ञांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन सत्र आयोजित करत आहेत. हे जोडपे आय एम बुद्धा फाउंडेशन चालवित आहेत. या संदर्भात पल्लवी जोशी म्हणतात की, “या समुपदेशन सत्राचे लक्ष्य लहान मुले आणि किशोरवयीन मुले आहेत, ज्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपले एक किंवा दोन्ही पालक गमवल्याने, मानसिक  स्वास्थ गमावले आहे. 

यासाठी या जोडप्याने  ''नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स (एनसीपीसीआर)'' महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण आयोग बरोबर करार केला आहे.विवेक अग्निहोत्री म्हणतात की, मुलांचे मानसशास्त्रज्ञां कडून सुयोग्य देखरेखीखाली अत्यंत कौशल्यपूर्वक सत्रे घेतली जातात. “ आम्ही अशा मुलांचाही विचार करत आहोत ज्यांचे संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन आहे, कारण कधी कधी या मुलांशी वागताना, त्यांना हाताळताना बहुतेक वेळा नातेवाईक कमी पडतात.   पल्लवी आणि विवेक एनजीओसमवेत सध्याच्या परिस्थितीमुळे पीडित असलेल्या मुलांची आणि कुटूंबाच्या मदतीवर भर देत आहेत. 

टॅग्स :पल्लवी जोशी