Join us
Daily Top 2Weekly Top 5

निया शर्माच्या फॅशनचा ‘कचरा’; ट्रोलर्स म्हणाले, कचऱ्याची पिशवी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 14:51 IST

गाडी वाला आया... घर से कचरा निकाल, असे लिहित एका युजरने नियाला ट्रोल केले.

ठळक मुद्दे‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली.

निया शर्मा म्हणजे, छोट्या पडद्यावरची बोल्ड अभिनेत्री. निया ही छोट्या पडद्यावरची ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाते. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते.  नियाने फोटो शेअर केलेत आणि त्याची चर्चा झाली नाही, असे अभावानेच घडते. सध्या तिच्या अशाच फोटोंची चर्चा आहे. या फोटोमुळे निया सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय.  

नियाने तिचे काही फोटो नुकतेच शेअर केले आहेत. यामध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिनं या ड्रेससोबत मँचिंग टोपी आणि शूजही घातले आहेत. यातील एका फोटोमध्ये ती खुर्चीमध्ये बसून आराम करत आहे. तर, दुस-या फोटोमध्ये एका लक्झरी गाडीशेजारी उभा राहून पोज देत आहे. नियाच्या पोजबद्दल तर चाहत्यांची तक्रार नाही. पण तिचा ड्रेस पाहून चाहत्यांनी तिची जोरदार खिल्ली उडवली आहे. काहींनी याला गाडीचा कव्हर म्हटले आहे. काहींनी छत्री तर काहींनी कचऱ्याची पिशवी म्हटले आहे. गाडी वाला आया... घर से कचरा निकाल, असे लिहित एका युजरने नियाला ट्रोल केले आहे.

 वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच निया शर्मा आणि रवि दुबे यांच्या सीरिजचा दुसरा सीजन ‘जमाई राजा 2.0’ प्रदर्शित होणार आहे. याचा टीजर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची याबद्दलची उत्कंठा आणखीच वाढली आहे.  सीरिजचा पुढचा सीजन 26 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना पाहाता येणार आहे.

‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली. यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही ती दिसली. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. 2017 मध्ये ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन;च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50  ‘मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती. 

टॅग्स :निया शर्मा