Join us

एथनिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दितसेय नेहा पेंडसे, फोटोंनी वेधलं चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:00 IST

अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करते.  नेहाने एथनिक ड्रेसमधलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.  पंजाबी ड्रेसमध्ये नेहा खूपच सुंदर दिसते आहे. 

 ड्रेसमध्ये नेहा पेंडसेच्या विविध छटा पहायला मिळत आहेत. नेहाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या ड्रेससोबत तिच्या सोज्वळ अदा आणि कानातील डुलनेदेखील या लूकला चारचाँद लावले आहेत. नेहाच्या चाहत्यांना तिचा सिंपल लूक भावला आहे. फोटोवर चाहत्यांनी लाईक्स सह कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा जून चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत..याशिवाय नेहा  'सुरज पे मंगल भारी' या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :नेहा पेंडसे