Dacoit: दाक्षिणात्य अभिनेता अदिवि शेषचा बहुचर्चित चित्रपट 'डकैत'ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अदिवी शेषसोबत कोणती अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. आता याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Hassan) मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. परंतु निर्मात्यांनी त्यावर कोणतीही माहिती दिलेली नाही. शिवाय या प्रोजेक्टमधून श्रुती हसनचा पत्ता कट झाल्याचं कळतंय. त्यातच आता सोशल मीडियावर अभिनेत्री चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. डकैतमध्ये मराठमोळी अभिनेत्री 'सीतारामम' फेम मृणाल ठाकुरची (Mrunal Thakur) वर्णी लागली आहे. त्यामुळे तिचे चाहेत देखील उत्सुक आहेत.
अभिनेता अदिवी शेषने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "बचाया मैंने उसको… लेकिन छोड़ गई… वो कौन है… क्या है… कल पता चलेगा", या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सिनेरसिकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.
पॅन इंडिया अॅक्शन ड्रामा डकैत सिनेमा येत्या २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येईल. शनैल देऊ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शक आहेत तर सुप्रिया यारलगुड्डा यांची निर्मीती आहे.
वर्कफ्रंट
अदिवी शेष हा साऊथ इंडस्ट्रीमधील एक मोठा स्टार आहेत. 'बाहुबली' चित्रपटात त्याने भल्लादेवच्या मुलाची भूमिका साकारून आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली होती. रिअल लाईफ हिरो 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन के यांच्या आयुष्यावरच्या 'मेजर' या चित्रपटात त्यानं मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाचं जबरदस्त कौतुक झालं होतं. अदिवी शेष हा त्याच्या हँन्डसम लूक आणि अभिनयामुळे चाहत्यांचा लाडका आहे.