Join us
Daily Top 2Weekly Top 5

या कलाकारांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा केलाय प्रयत्न! लिस्टमध्ये आहे एक लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 17:38 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रीने स्वतःला संपवायचा केलाय प्रयत्न

काही दिवसांपूर्वी सुपरस्टार अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. स्वतःच्या पिस्तुलातून नकळतपणे गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाला. या घटनेनंतर अनेकजणांनी गोविंदावर संशय व्यक्त केला. गोविंदाने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला का? अशीही अटकळ बांधली जाऊ लागली. अर्थात गोविंदाने काय घडलं याचा खुलासा स्वतः केल्याने या चर्चांमध्ये काही तथ्य राहत नाही. दरम्यान बॉलिवूडच्या काही कलाकारांनी स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. कोण होते ते? जाणून घ्या

अमित सध आणि मनोज वाजपेयींनी उचललेलं टोकाचं पाऊल

'काय पो चे' या लोकप्रिय सिनेमात अभिनय केलेला अमित सधने नैराश्याच्या भरात टोकाचं पाऊल उचललं होतं. अमितने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत 'काय पो चे' सिनेमात अभिनय केलेला. एक वेळ अशी आली होती की अभिनय क्षेत्र सोडून अमित नैराश्याच्या भरात टोकाचं पाऊल उचलणार होता. इतकंच नव्हे तर त्याने तब्बल चारवेळा स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे दिल्लीच्या प्रसिद्ध NSD मध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून मनोज वाजपेयींच्या मनात स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार आला होता.

 

मृणाल ठाकूरच्या मनातही आलेले विचित्र विचार

बॉलिवूड आणि साऊथमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री मृणाल ठाकूरही उदासीच्या भावनेत स्वतःचं आयुष्य संपवणार होती. मृणालने टीव्ही इंडस्ट्रीपासून सुरुवात करुन नंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. परंतु स्ट्रगलच्या काळात कुठेच काही काम होत नव्हतं तेव्हा मृणालने ट्रेनसमोर उडी घेऊन स्वतःला संपवण्याचा विचार केला होता. अनेकदा मृणालच्या मनात असे विचार डोकावून गेले, याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केलाय.

टॅग्स :मृणाल ठाकूरअमित संधमनोज वाजपेयी