Join us
Daily Top 2Weekly Top 5

तैमूर अली खानला टक्कर देतायत अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुली, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 14:58 IST

खरंतर लिजा आणि जेसन दोघांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे. वयाच्या चाळीशीत या दोघांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्दे 'सूफी' आणि 'सोलेल' या दोन्ही मुलींची नावे आहेत. साडी नेसलेल्या या दोन्ही चिमुलकल्या खूप गोड दिसत आहेत.या चिमुकल्या मुली आपल्या निरागसतेने तैमूर अली खानला सोशल मीडियावर टक्कर देत असणार.

करीनाचा लेक तैमूर अली खान माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तैमूरची कोणतीही गोष्ट लगेच बातमी बनते. असंच काहीसं सध्या घडतंय बॉलिवूड अभिनेत्री लिजा रेच्या जुळ्या मुलींबद्दल, लिजाच्या जुळ्या मुली अवघ्या एक वर्षाच्या आहेत. सध्या लिजा आपल्या मुलींचे बालपण एन्जॉय करते. 'सूफी' आणि 'सोलेल' या दोन्ही मुलींची नावे आहेत. आपल्या लाडक्या लेकींचे सगळे क्युट फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. नुकतेच लिजाने आपल्या मुलींचे साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताच या फोटोंवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

साडी नेसलेल्या या दोन्ही चिमुलकल्या खूप गोड दिसत असून यांच्यावरून तुमचीही नजर हटणार नाही असेच हे क्युट फोटो सध्या सा-यांची पसंती मिळवत आहेत. पारंपरिक साड्यांमध्ये इवल्याशा मुलींचा हा अंदाज सा-यांची पसंती मिळवत आहेत. विशेष म्हणजे  या चिमुकल्या मुली आपल्या निरागसतेने तैमूर अली खानला सोशल मीडियावर टक्कर देत  असणार यांत काही शंका नाही. 

लिजाने जेसन डेहनीसह लग्न केले आहे. मुळात जेसनसह लग्न केल्यानंतर लिसाचे आयुष्य सुरळीत सुरू झाले असं लिसाला वाटतं. 2009 साली लिजाला कॅन्सर झाला होता. तो काळ लिसासाठी खूप कठिण होता. त्याकाळात जेसननेच लिजाला खपू धीर दिला आणि त्यामुळे आज लिजा या आजारावर मात करू शकली. खरंतर लिजा आणि जेसन दोघांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे.

वयाच्या चाळीशीत या दोघांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे लिजा आणि जेसन जॉर्जियाला शिफ्ट झाले. सरोगसीच्या माध्यमातून लिजाने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला आणि आज लिजा आपले मुलींचे बालपण एन्जॉय करत आहे.  

टॅग्स :लिजा रे