Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री ईशा केसकर मराठमोळा साज श्रृंगार दिसली लयभारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 18:33 IST

अभिनेत्री ईशा केसकर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते

अभिनेत्री ईशा केसकर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. ईशा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इशाच बोलबाला असतो. अलीकडेच इशाने तिचे साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पिंक रंगाच्या साडीत ईशा खुपच सुंदर दिसते आहे. इशाचा हा फोटो तिच्या चाहत्यांचाही पसंतीस उतरला आहे. त्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

काही दिवसांपूर्वीच इशाने 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सोडली. लॉकडाऊन काळात मालिकेचे शूटींग बंद होते. यानंतर तीन महिन्यानंतर मालिकेचे शूटींग सुरु झाले. याच काळात इशाच्या दाढेचे ऑपरेशन झाले. दाढेचे ऑपरेशन झाल्यामुळे  दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हती. तिच्यामुहे मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते. अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इशाने व्हिडीओ याची माहिती दिली आहे.

ईशाला जय मल्हार या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. ईशा अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. 

टॅग्स :ईशा केसकर