Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री हृता दुर्गुळेने सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला त्यांच्यासोबतचा खास फोटो, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:52 IST

ह्रता आणि तिच्या सासूबाईंमध्ये खास बॉन्डिंग आहे. टाइमपास 3 च्या प्रीमियरदरम्यान ते सगळ्यांना दिसले होते.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (hruta durgule). छोटा पडदा गाजवल्यानंतर हृता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकली आहे. टाईमपास ३ आणि अनन्या हे तिचे दोन सिनेमे अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक देखील प्रेक्षकांनी केलं आहे. हृता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्ट्स वा पर्सनल लाइफविषयी माहिती देत असते.

ह्रताने तिच्या सासू बाई आणि अभिनेत्री मुग्धा शाह यांच्यासोबतचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. मुग्धा शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्रताने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ह्रताने लिहिले, वाढदिवसाच्या शुभेच्छा मा, तुम्ही जशा आहात तशाच राहा,स्ट्राँग, बिनधास्त आणि स्वतंत्र. ह्रता आणि तिच्या सासूबाईंमध्ये खास बॉन्डिंग आहे. टाइमपास 3 च्या प्रीमियरदरम्यान ते सगळ्यांना दिसले. 

हृता दुर्गुळेच्या सासूबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. 'बे दुणे साडे चार', 'मिस मॅच', 'माहेर माझं हे पंढरपूर', 'संभव असंभव' सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत. 

तर हृताचा नवरा प्रतीक शाहदेखील हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने 'बेहद २', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदडी', 'इक दिवाना था' या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटी