Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं हॉटेल व्यावसायिकावर लावला गैरवर्तनाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 18:12 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एका हॉटेल व्यावसायकावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ता हिचा वन डे : जस्टिस डिलिवर्ड हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेते अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर ईशा आपल्या फ्रेंड्ससोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. यावेळी तिला आलेला वाईट अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ईशाने हॉटेल व्यावसायिक रोहित विगवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. ईशाने पोस्टमध्ये म्हटलं की, रोहितचे माझ्याकडे पाहणे माझ्यावर बलात्कार करण्यासारखेच होते. ईशाने ट्विट केले की, जर देशात माझ्यासारखी एखादी महिला असुरक्षित अनुभव करत असेल तर बाकी मुलींना कसं वाटत असेल. माझ्यासोबत दोन सिक्युरिटी गार्ड असतानाही मला असा अनुभव आला.  असं वाटलं जणू आपल्यावर रेप केला आहे. रोहित विग तू डुक्कर आहेस. घाणीचा हकदार आहे. 

पुढे ट्विटमध्ये म्हटले की, महिलांना सुरक्षित न वाटण्याला रोहित विग सारखे व्यक्तीच कारणीभूत असतात. तू माझ्या अवतीभोवती होतास तुझी नजर आणि रोखून बघणेच पुरं होतं.

याव्यतिरिक्त तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात ती म्हणते की, काही लोक खूपच असभ्य असतात. असे वाटते ते कधीच काही शिकू शकत नाहीत ती अनोळखी लोकांशी कसे वागले पाहिजे. त्यांना वागणं व बोलणंही शिकवण्याची गरज आहे. 

ईशाने एका व्यक्तिसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत तिने लिहिले की, माझ्या मागील पोस्ट विषयी. हा माणूस नुसत्या नजरेनं माझा रेप करत होता. अशावेळी माझ्यासोबत माझे सुरक्षारक्षक शांत व दक्ष होते, हे बरं झांल. कोणी ओळखतं का या माणसाला? या माणसाला तीन वेळा नीट वागायला सांगितले.

याशिवाय माझ्यासोबत दोन गार्ड आहेत. सिक्युरिटी कॅमेऱ्याच्या मदतीनं या गोष्टी निश्चित केल्या जाऊ शकतात. कोण आहे हा भविष्यातील रेपिस्ट. ईशासोबत गैरवर्तन करणारा व्यक्ती गोव्यातील हॉटेलचा मालक आहे.

टॅग्स :ईशा गुप्ता