Join us

गिरीश ओक यांच्यापेक्षा माझ्या जास्त डिमांड्स? 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडलेल्या अभिनेत्रीची खंत

By देवेंद्र जाधव | Updated: July 24, 2025 15:51 IST

तब्येतीच्या कारणास्तव दिशा परदेशीने 'लाखात एक आमचा दादा' मालिका सोडली होती. पण आता मालिका सोडल्यावर दिशाने सेटवर काय घडलं, याचा खुलासा केलाय

अभिनेत्री दिशा परदेशी काही दिवसांपूर्वी 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत झळकली. तब्येतीच्या कारणास्तव दिशाने मालिका सोडल्याचा खुलासा केला. पण नुकत्याच एका मुलाखतीत दिशाने याच मालिकेच्या सेटवर घडलेल्या गोष्टीचा खुलासा केला. या गोष्टीचा दिशाला थोड्याफार प्रमाणात त्रासही झाला. मराठी मनोरंजन विश्वला दिलेल्या मुलाखतीत दिशा म्हणाली, "प्रॉडक्शन डिपार्टमेंटकडून आपल्याबद्दल काही बोललं जातंय, असं दिशाला कळालं.  "हिची खूप नाटकं आहेत, हिच्या खूप डिमांड्स आहेत."

"आमच्या शोमध्ये माझे जे वडील आहेत ते गिरीश ओक दाखवले आहेत. ते खूप सीनियर अभिनेते आहेत. हिच्या तर गिरीश ओकांपेक्षा जास्त डिमांड्स आहेत. मी हे ऐकल्यावर हसले. पहिली गोष्ट गिरीश ओक कुठे आणि मी कुठे? दुसरी गोष्ट की, गिरीश ओकांना कोणत्यातरी वेगळ्या सेटवर घेऊन गेले आहेत. तिथे कुठेतरी कानाकोपऱ्यात शूट करायचंय. जर त्यांना बाथरुमला जायचं असेल तर ते निसर्गाच्या सानिध्यात उभं राहून करु शकतात. मी करु? मग आता करा ना तुलना. साधी गोष्ट आहे."

"गिरीश ओकांपेक्षा हिच्या जास्त डिमांड्स आहेत.. म्हणजे तेव्हा मला फार गंमत वाटली. मी या गोष्टींचा जास्त स्ट्रेस नाही घेत. मी हेच म्हणेन की, ते बाथरुमला जाऊ शकतात, मी जाऊ शकते का? की मी पण करु त्यांच्यासारखं. असं काही नाहीये, त्यांना हे सांगितलं, नाही सांगितलं मला माहिती नाही, पण जेव्हा माझ्या हे कानावर आलं तेव्हा तर असंच होतं. "

"म्हणजे प्रॉडक्शन आपल्याला काहीही विचारतं की, तू आज हे करशील का? ते करशील का? माझं एकच असतं की, तुम्ही सीनियर अभिनेत्याला हे विचारु शकता का?  मग मी काय म्हणून मी हे करायला पाहिजे! हे रुमर मी ऐकलंय. आता कुठलीही अफवा आपण ऐकतो तेव्हा कुठेतरी एक टक्का ठिणगी पडलेली असते. जर मी काही विचारते की, मला फॅन मिळेल का? मग पुढे, अच्छा आता तर हिला फॅन हवाय? असं बोललं जातं. अरे मी एसी नाही मागितला फॅन मागितला फक्त. त्यामुळे वाढवून चढवून या गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे मला त्रास होतो. पण माझा एक मंत्र आहे, सोड ना!"

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटमराठी गाणी