Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या वडिलांचे निधन, फोटो शेअर करत झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 12:25 IST

भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बाबांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

भाग्यश्री लिमये हिचे वडील माधव लिमये यांचं गुरुवारी निधन झाले आहे. भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बाबांसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला  'रेस्ट इन पीस बाबा' असं कॅप्शन दिलं.  भाग्यश्रीच्या पोस्टवर मराठी इंडस्ट्री आणि  टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सुबोध भावे, सुव्रत जोशी, स्पृहा जोशी. शंशाक केतकर आणि श्रुती मराठेसह अनेक कलाकारांनी भाग्यश्रीला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भाग्यश्रीच्या वडिलांवर सोलापूरमध्ये उपचार सुरु होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. भाग्यश्री नेहमीच तिच्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या फोटोमधून तिच्या पालकांसोबत तिचे असलेले स्ट्रॉँग बॉडिंग कायम दिसते. 

भाग्यश्रीने 2017मध्ये 'घाडगे & सून' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणेची भूमिका चांगलीच गाजली. अभिनय श्रेत्रात येण्यापूर्वी भाग्यश्री एका आयटी कंपनीमध्ये काम करत होती. भाग्यश्रीने अनके जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.  

टॅग्स :भाग्यश्री लिमेय