Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला मोठा धक्का बसला..." अक्षय कुमारच्या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 09:37 IST

प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या शिकार झाल्या आहेत. ही इंडस्ट्रीची एक काळीबाजू आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही. आता बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडल  डॉ. अदिती गोवित्रीकर ही कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अदितीने हिंदी चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये ठसा उमटवला. पण सिनेइंडस्ट्रीत आलेल्या एका भयंकर अनुभवामुळं तिनं बॉलिवूडपासून  दूर राहण्याचा निर्णय घेतला.

कास्टिंग काऊचवर बोलताना आदितीने 'आज तक'ला सांगितले की, तिचे नेहमीच डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते, तिला अभिनेत्री किंवा मॉडेल व्हायचं नव्हते.  मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं होतं. एक काळ असा होता की, मला मॉडेलिंगमध्ये इंटरेस्ट वाटू लागला. मी खूप वर्षे मॉडेलिंग केलं. पण तरीही माझा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. मी आजवर काही मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं. मी माझं काम करत होते, पण मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. त्यामुळं मी या क्षेत्रातून काढता पाय घेतला, असं अदितीनं सांगितलं.

पुढे अदिती म्हणाली,''मला एका मोठ्या सिनेमाची ऑफर आली होती, पण त्यासाठी माझ्याकडे नको त्या गोष्टीची मागणी करण्यात आली होती, मी तेव्हा ती ऑफर स्वीकारली असती, कॉम्प्रमाइज करावं लागलं असतं आणि आज मी टॉपच्या ए-लिस्टर अभिनेत्रींच्या यादीत असते. या घटनेनंतर तिला धक्का बसला. पण ती ऑफर नाकारल्याचा कधीच पश्चाताप झाला नाही. मी माझ्या घेतलेल्या करिअरच्या निर्णयावर खूश आहे.''

टॅग्स :सेलिब्रिटीकास्टिंग काऊच