Join us

'देवमाणूस' मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ढसाढसा रडले कलाकार, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 15:35 IST

Devmanus: सध्या सोशल मीडियावर मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यात कलाकार रडताना दिसत आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' (Devmanus)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील पात्रदेखील खूप चर्चेत आली होती. या मालिकेमध्ये डॉक्टर अजित कुमार देव अनेकांना फसवताना दाखवण्यात आले आहे. या मालिकेच्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यात कलाकार रडताना दिसत आहेत. 

देवमाणूस २ मालिकेच्या शेवटच्या भागाच्या चित्रीकरणामध्ये किरण गायकवाड याच्यासह रेश्मा शिंदे, टोण्या, बजा हे सगळेच कलाकार ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळत आहे. एकूणच काय शेवटच्या भागाचे चित्रीकरण केल्यानंतर अतिशय भावनिक वातावरण सेटवर निर्माण झाले होते अनेकांनी ही मालिका बंद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तर मात्र काही जणांनी ही मालिका लवकर बंद करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आता मात्र ही मालिका बंद झाली आहे.

देवमाणूस मालिकेच्या जागी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट पहायला मिळणार आहे.

टॅग्स :'देवमाणूस २' मालिका