Join us

स्वप्निल जोशी वडिलांच्या वाढदिवसाला झाला भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाला- माझे बाबा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:55 IST

Swapnil joshi: अभिनयावर प्रेम करणाऱ्या स्वप्नीलचं त्याच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. आज त्याने वडिलांसाठी एका खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी (swapnil joshi).उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वप्नीलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण करणारा स्वप्नील आज गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बऱ्याचदा तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनयावर प्रेम करणाऱ्या स्वप्नीलचं त्याच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे हे त्यांच्या अनेकवेळा सोशल मीडियावरील पोस्टवरुन दिसते. स्वप्निल जोशीच्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

 स्वप्निल जोशीच्या वडिलांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. स्वप्निलनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, माझे बाबा राॅकस्टार आहेत. ते मला नेहमी म्हणतात, एखादी गोष्ट करून बघावी. केलंच नाहीस तर कसं कळणार, जमतंय की नाही. हे त्यांचे फंडा आहेत. मला नेहमीच तुमच्यासारखं व्हायला आवडलं असतं. तीच माझी इच्छा होती. मी तुमची पूजा करतो. स्वप्निलची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. अनेक सेलिब्रेटींनी त्याच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान दुनियादारी', 'मितवा' अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. उत्तम अभिनयशैली आणि गुड लुकिंगच्या जोरावर आज तो चॉकलेट बॉय म्हणून ओळखला. जातो. रुपेरी पडदा गाजवल्यानंतर स्वप्नीलची पावलं छोट्या पडद्याकडे वळली आहेत. त्यामुळेच सध्या तो तू तेव्हा तशी या मालिकेत झळकत आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीसेलिब्रिटी