Join us  

'धमाल चित्रपट दिल्याबद्दल...', अभिनेता सुबोध भावेची 'झिम्मा २' साठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 3:50 PM

हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेल्या 'झिम्मा २' ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत 'झिम्मा २' हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेल्या झिम्मा २ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. जिकडेतिकडे 'झिम्मा २'च्या शोचे हाऊसफुल बोर्ड लागत आहेत. सात महिल्यांच्या रियुनियनची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने महिला प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  ‘झिम्मा 2′ सिनेमाचं कौतुक फक्त प्रेक्षक नाही तर, सेलिब्रिटी देखील करताना दिसत आहेत. अभिनेता सुबोध भावेने 'झिम्मा २' साठी खास पोस्ट केली आहे.   

सुबोध भावेने 'झिम्मा २' चा फोटो आपल्या स्टोरीवर शेअर केला आहे.  त्याने लिहले की, 'आजूबाजूच्या हिंदी सिनेमांच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट हाऊसफूल्ल गर्दीत चालू आहे, याचा प्रचंड आनंद आहे. रसिक प्रेक्षकांना धन्यवाद आणि धमाल चित्रपट दिल्याबद्दल ‘झिम्मा २’ संघाचे खूप कौतुक'. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुबोध भावेच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. 

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा'चा 'झिम्मा २' सिक्वल आहे. या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या महिलांचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे.  सिनेमाने आतापर्यंत जवळपास 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सिनेमा किती कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :सुबोध भावे बॉलिवूडसेलिब्रिटी