Join us

'शुभमंगल ऑनलाईन'मधील हा अभिनेता अडकला लग्नबेडीत, त्याची पत्नीदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 18:09 IST

शर्मिष्ठा राऊतनंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील हे कपल विवाहबंधनात अडकले आहेत.

कलर्स मराठी वाहिनीवर नुकतीच शुभमंगल ऑनलाईन ही मालिका दाखल झाली आहे. या मालिकेत सायली संजीव आणि सुयश टिळक मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकतेच या मालिकेतील अभिनेता गुरू दिवेकर लग्नबेडीत अडकला आहे. त्याने ही माहिती सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली आहे. 

गुरू दिवेकरचा १९ ऑक्टोबर रोजी पुण्यात अभिनेत्री मधुरा जोशीसोबत विवाह बंधनात अडकला आहे. या सोहळ्याला मोजके नातेवाईक आणि मित्र मंडळी उपस्थित होते.

गुरू आणि मधुरा यांनी एकत्र काही मालिकेत काम केले आहे. सोनी मराठी वाहिनीवरील हर्षद अतकरी आणि गौतमी देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत या दोघांनी काम केले आहे. 

मधुरा श्रीमंता घरची सून या मालिकेत दिसणार आहे. ही मालिका २६ ऑक्टोबर पासून सोनी मराठी या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

मधुरा उत्कृष्ट गायिका असून ती कथक विशारदही आहे.  

प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसुजाच्या डान्स प्लस ३ या शोमध्ये ती सहभागी झाली होती. 

टॅग्स :सायली संजीवसुयश टिळक